Home > मॅक्स किसान > परभणीत कपाशीला गुलाबीची लागण

परभणीत कपाशीला गुलाबीची लागण

परभणीत कपाशीला गुलाबीची लागण
X

परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला असून, सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जिल्हा कृषी विभागाणे आता सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणानंतरच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. मात्र या अळीचा प्रादुर्भावमूळे कापूस उत्पादन शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. या गुलाबी अळीला नियंत्रणाखाली आणण्यासाठी कृषी विभाग जोमाने कामला लागला आहे.

जिल्ह्यात ५ लाख २२ हजार क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीच्या नियोजन करण्यात आलं होतं. त्यापैकी २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस प्रस्तावित होता. एकूण १ लाख ८८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. जिल्ह्याभरात कापसाची पहिली वेचणी झाली होती. ऐकूण ६ वेचण्या केल्या जातात. मात्र पहिल्या वेचणीनंतरच कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यात कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. एक ही तालुका वाचला नाही. या नव्या संकटामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याच चित्र जिल्हा भारत दिसून येत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांनी या विषयी कृषी विभागाकडे तक्रारी सुद्धा केल्या आहेत. ४० टक्के कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचं बोललं जात आहे. या विषयी आम्ही जिल्हा कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी, आर. टी. सुखदेव यांना दुरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

गुलाबी अळीच्या प्रादुर्भावामूळे कापूस उत्पादक शेतकरी नव्या संकटात सापडलाय. यावर जिल्हा कृषी विभागाने तात्काळ उपायोजना केल्या नाही. तर कापूस उत्पादक शेतकरी आणखीणच अडचणीत येऊ शकतो.

Updated : 21 Nov 2017 2:59 PM GMT
Next Story
Share it
Top