देशातला सर्वात मोठा जाहिरातदार ‘भाजप’

21878

भाजप हा पक्ष देशातला सर्वात मोठा टीव्ही जाहिरातदार ठरला आहे. ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०१७ दरम्यानच्या आठवड्यात भाजपनं टीव्ही जाहिरातीमध्ये देशातल्या सर्व मोठ्या ब्रांड्सला मागे टाकलं आहे. बार्क या रेटींग एजन्सिनं नुकतीच त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात भाजपनं  ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान सर्वात जास्त जाहिरात केल्याचं सिद्धा झालंय. या आकडेवारीनुसार भाजपच्या जाहिरातींचा इनसर्शन्स (Insertions) हा 16,670 एवढा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअरटेल पेमेंट बँकच्या जाहिरातींचा इनसर्शन्स (Insertions) हा 12,244 एवढा आहे.

‘बार्क’ ही एजन्सी दर आठवड्याला देशातल्या सर्व टीव्ही चॅनेल्सचे टीआरपी आणि इतर आकडे देत असते. वरिल चित्रातील चार्ट सुद्धा त्यांनीच दिलेला आहे. त्यात देशातल्या टॉपच्या १० जाहिरातदारांची यादी आणि त्यांचा इनसर्शन्स (Insertions) देण्यात आला आहे.