Top
Home > मॅक्स रिपोर्ट > दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई
X

अंमली पदार्थविरोधी पथकानं मुंबईतल्या अंधेरीत एक किलो एमडी ड्रग जप्त केलंय. तसंच दोघांना अटक केलीय. दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी या खात्याचा चार्ज घेतल्यानंतर ही पहिलीच कारवाई आहे. सुनील धुतिया (२४) आणि विकी नाडर (२५) अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून एक गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. अंधेरीमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केलीय. हे दोघंही एअर कार्गोच्या माध्यमातून अंमली पदार्थ परदेशात पाठवण्याचा प्रयत्न करत होते, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, सुनील धुतिया हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहेत.

Updated : 12 Feb 2017 11:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top