तो महिलेला मारत राहीला, आरपीएफवाले सीसीटीव्हीवर मज्जा पाहत राहिले

416

रेल्व स्थानका येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी कायद्यानं आरपीएफवर आहे. पण, हेच आरपीएफचे जवान किती षंढ आहेत हे या व्हिडीओतून तुम्हाला दिसेल. व्हिडीओत एक पुरूष एका महिलेला शेकडो लोकांच्या समक्ष मारत आहे. साधारण पाच मिनिटं हा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर सुरू होता. सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद होत होता. कंट्रोल रूममध्ये बसलेले आरपीएफवाले हा सर्व प्रकार पाहत होते. पण, त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही की प्लॅटफॉर्मवर असलेल्या जवानांना याबाबत सूचना दिली. याउलट तक्रार देण्यासाठी कंट्रोल रूममध्ये गेलेल्या महिलेला “अच्छा वो आप थी क्या मार खानेवाली” असा प्रतीसवाल केला. यावरूनच हे जवान किती षंढ आहेत याचा प्रत्यय येतोय. शेवटी विनु वर्गिस या स्थानिक समाजसेविका पीडित महिलेच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी रेल्वे पोलीस डीसीपी समाधान पवार आणि सिनिअर पी.आय. दत्ता पाबळे यांच्याशी संपर्क करून प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती.  महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेनं मात्र घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय. तसंच आरोपीला कडक शासन करण्याची मागणी केलीय.

नेमकी घटना काय ?

ही घटना कल्याण रेल्वे स्थानकातली आहे. २४ जानेवारीला हा प्रकार घडलाय. पीडित महिला ट्रेनमधून उतरत असतांना व्हिडीओत दिसणाऱ्या पुरूषानं तिला धक्का दिला. महिलेनं त्याला जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये हामरीतुमरी झाली. हातवारे करून बोलणाऱ्या या इसमाच्या हातावर पीडित महिलेनं फटका मारताच त्या पुरूषानं तिच्या थोबाडात माराल्या. स्थानकात उभ्या असेलल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. काही वेळानं लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण, त्या इसमानं पुन्हा महिलेला मारहाण केली.