Top
Home > मॅक्स किसान > तूर डाळीची स्वस्ताई!

तूर डाळीची स्वस्ताई!

तूर डाळीची स्वस्ताई!
X

तब्बल २३० रुपये किलो पर्यंत गगना दर भिडलेले तूर डाळीचे भाव आता खाली येणार असून, तूर डाळ जनतेला स्वत दरात मिळणार आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडाळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार त्यांच्या स्टॉकमध्ये असलेली २५ लाख क्विंटल तूर डाळीचे भरडई करून स्वस्त धान्य दुकानातून विकण्यात येणार आहे. एक किलो आणि ५ किलोग्रॅम मध्ये पॅकिंग करणार असून नंतर ही पॅकिंग किरकोळ विक्रीसाठी व्यापाऱ्यांना विकली जाणार आहे.

ही तूर डाळ ५५ रुपये प्रति किलोने विकली जाणार आहे. यासह, दारिद्र्य रेषेच्या वरील रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील ही डाळ विकत घेण्याचा अधिकार असेल.

२ वर्षांपूर्वी देशात २०१५ च्या सुमारास तूर डाळीचे दर आकाशाला भिडले होते. २३० रुपयांपर्यंत डाळीचे भाव पोहोचले होते. परंतु त्यानंतर २०१६ मध्ये मान्सून चांगला होता आणि म्हणून तूर डाळीचे एकूण उत्पादन ४७.८ दशलक्ष टन झाले.

तूर व्यतिरिक्त इतरही डाळींचे चांगले उत्पादन झाले आहे. या वर्षाअखेर देशात सुमारे ४० लाख टन तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. जे सरासरीपेक्षा तुलनेने चांगले आहे.

Updated : 21 Nov 2017 3:43 PM GMT
Next Story
Share it
Top