Home > मॅक्स किसान > तब्बल ११ टक्क्यांनी कापूस उत्पादन वाढणार...

तब्बल ११ टक्क्यांनी कापूस उत्पादन वाढणार...

तब्बल ११ टक्क्यांनी कापूस उत्पादन वाढणार...
X

देशातील कापूस उत्पादन यंदा जवळपास ११.३ टक्कयांनी वाढून ३७५ लाख गाठी (१ गाठ १७० किलोची असते) इतके होणार असल्याचा अंदाज सीएआयने अर्थात कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.

या हंगामात कापुस लागवडीचे क्षेत्र १९ टक्क्यांनी वाढल्याने कापसाच्या यंदाच्या उत्पादना ३७.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागील वर्षी ३३७.२५ लाख कापसाच्या गाठींचं उत्पादन झाले होते तर हे उत्पन्न वाढून यंदा ३७५ लाख गाठी वाढणार आहे. मात्र दुसरीकडे गुलाबी बोंडअळी रोगाच्या प्रादुर्भावमुळे कापुस पिकाचे काही प्रमाणात घटण्याची शक्याता आहे. असाही अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे.

यंदा देशात १७ लाख गाठी तर देशांतर्गत ३२० लाख कापसाच्या गाठींची आवक होणार आहे. तर देशाबाहेर ६३ लाख कापसाच्या गाठी निर्यात होणे अपेक्षित आहे, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

मागील वर्षी उत्तर प्रदेशात ४६ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ते वाढून ५५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. भारतातील मध्यवर्ती भागातील म्हणजे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात आदी राज्यातील उत्पादन वाढून २१२ लाख गाठी तर दक्षिणेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातूनही १०३ लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते असाही अंदाज कॉटन अशोशिएशन ऑफ इंडीयाने व्यक्त केलाय.

दरम्यान यंदा कापसाचे भरघोस उत्पादन झाले असले तरी कापसाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून देशातील विविध संघटना आंदोलन करत आहे.

Updated : 17 Nov 2017 7:03 AM GMT
Next Story
Share it
Top