डीएसकेंना ‘दडपण’ देणारी माणसं

497

डीएसके, उद्योग क्षेत्रातलं अग्रगण्य मराठी नावं. पण, डीएसके डबघाईला आले आहेत का? त्यांची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. कंपनीला कुणी वाली उरलेला नाही. गुंतवणूकदारांनी पाठ फिरवलीय. अशा एक ना अनेक अफवा डीएसके म्हणजेच डी.एस कुलकर्णी यांच्याबाबत मार्केटमध्ये पसरत होत्या. त्यातच त्यांचा स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात कंपनी आर्थिक संकटात आहे. लोकांचे पगार देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही नोकऱ्या सोडून जा नाहीतर मी आत्महत्या करतो असं डीएसके या व्हिडीओमध्ये बोलतांना दिसत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल होताच डीएसकेंनी लगेचच त्यावर स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. ज्यात कंपनीची स्थिती उत्तम आहे. कुणीतरी जाणूनबुजून माझी बदनामी करत आहे असा आरोप त्यांनी केलाय. तसंच आधी व्हायरल झालेल्या व्हिडीओत बदल करून माझ्या तोंडी नको ती वाक्य टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

डीएसकेंनी उत्तर म्हणून बनवलेला व्हिडीओ