टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

13

शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाईम डिबेट शो मध्ये झालेल्या चर्चांचा सार

 

टीव्ही नाईन मराठी (चावडी)

टीव्ही नाईन मराठीच्या प्रसिद्ध ‘TV9 ची चावडी’ या शोमध्ये शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादामुळे राज्याचं मोठं नुकसान होते असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलं. सेना–भाजपमध्ये कौरव-पाडवांचा वादा सुरु आहे अशी टिका सुद्धा त्यांनी केली. मुंबईत काँग्रेसच्या तिकिट वाटपामध्ये गोंधळ झाल्याचं त्यांनी मान्य केलं. पण,आता सर्व कँग्रेस नेते एकत्र येऊन काम करत असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. निवडणूक रणनिती ठरवण्यासाठी एकत्र यायला काँग्रेस नेत्यांना वेळ मिळाला नाही हे सुद्धा त्यांनी मान्य केलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे भाजप सरकारला पाठिंबा देणार नाही हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, नोटाबंदीमागे विदेश क्रेडिटकार्ड कंपन्याचा हात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. तसंच नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगावर केलेल्या टिकेबद्दल माफी मागितली पाहिजे असंही ते म्हणालेत.

 

जय महाराष्ट्र ( न्यूजरूम लाईव्ह )

जय महाराष्ट्रच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये शनिवारी शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी गप्पा मारण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी खुल्या चर्चेला “आमने-सामने” बसावं. मुख्यमंत्री “वाघाशी सामना” करणार का? असं थेट आव्हान त्यांनी यावेळी दिलं. गेली २० वर्ष सत्तेत सहभागी असतांना भाजपचं तोडं शिवलं होतं का? तसंच याबबात गटनेते पद आणि सुधार समिती अध्यक्ष पद भुषवलेल्या आशिष शेलारांना विचारला असा खोचक सल्ला सुद्धा परब यांनी दिला. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही असं छातीठोकपणे त्यांनी सांगितलं. हार्दिक पटेल शिवसेनेचा प्रचार नाही तर बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी आला होता असंही परब म्हणालेत.

Comments