जेष्ठ विचारवंत डॉ.कृष्णा किरवले यांचा कोल्हापूरात खून

जेष्ठ विचारवंत डॉ.कृष्णा किरवले यांचा कोल्हापूरात खून झालाय. शिवाजी विद्यापीठानजीकच्या राजेंद्रनगर परिसरात्या त्यांचा रहात्या घरी चाकुने वार करून त्यांचा खून करण्यात आला. कृष्णा किरवले हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. त्याचसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुखपदही त्यांनी भुषवलं होतं. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, दलित साहित्य यांचा त्यांना गाढा अभ्यास होता. पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी फर्निचरचे पैसे न दिल्याच्या रागातून त्यांचा खून झाल्याची चर्चा आहे.