जेव्हा भाजपची सोशल मीडिया आर्मी चुकते

194

भाजपनं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा योगी आदित्यनाथ यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर ट्विटर आणि फेसबुकला प्रतिक्रियांचा महापूर आला. असं असतांनाही भाजपच्या उत्तर प्रदेश विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटनं केशव प्रसाद मौर्य यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं जाहीर करत त्याचं अभिनंदन सुद्धा केलं. अभिनंदनाच्या ग्राफिक्स प्लेटमध्ये उपमुख्यमंत्री लिहीलं. तर प्रत्यक्ष ट्वीटमध्ये मुख्यमंत्री लिहीलं. मात्र ही चूक लक्षात येताच यूपी भाजपनं त्याचं हे ट्विट मागे घेतलं आणि नवं ट्विट केलं.