जमावाची पोलिसाला मारहाण

पुण्यातील भोरमधील ही घटना आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ फेब्रुवारी २०१७ सोमवार ही शेवटची तारीख होती. त्यावेळी एका शिवसेना उमेदवारानं ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचा अर्ज दाखल केला. या घटनेमुळे शिनसेना कार्यकर्ते संतप्त झाले होते. तेव्हा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस निरिक्षक श्रीकांत खोत एकटेच करत होते. पण, जमावाला आवरणं त्यांना जमलं नाही आणि या जमावानं त्यांनाच मारहाण केली.