Home > मॅक्स किसान > 'चार आण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला'

'चार आण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला'

चार आण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला
X

सरकारकडून शेतकऱ्याला दिल्या गेलेल्या कर्जमाफीची जाहिरात करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यावर 21 हजार 80 रुपयाचे कर्ज असताना, त्याचे फक्त 339 रुपये माफ करत त्याची कुचेष्टा केली जात असल्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील पुसमध्ये उघडकीस आलाय. नरहरी गायके असं त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अंबाजोगाई तालुक्यतील पूस येथील शेतकरी, नरहरी यशवंत गायके यांच्या कर्जखात्यावर, डीसीसी बँकेच्या सोसायटीचे 21 हजार 80 रुपये कर्ज असल्याची माहिती पूस येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांनी दिली आहे. मात्र त्या शेतकऱ्याचे फक्त 339 रुपये माफ झाल्याची नोंद सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लिस्टमध्ये वेबसाईटवर केलीय.

नरहरी गायके या शेतकऱ्याला मणक्याचा आजार असल्याने ते सध्या अंथरुणावर पडून असतात. ज्यावेळी या शेतकऱ्याला कर्जमाफीचा अर्ज भरायचा होता, त्यावेळी त्यांना 500 रुपये खर्च आला होता. कर्जमाफीचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना अस वाटलं की, आता तरी आपल्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होईल. परंतु त्यांच्या या स्वप्नांवर पाणी सोडत, त्यांच्याकडे असलेल्या 21 हजार 80 रुपयांच्या कर्जापैकी फक्त 339 रुपये माफ करत, या आजारी असलेल्या शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचे काम या सरकारने केलं आहे.

Updated : 7 Nov 2017 1:41 PM GMT
Next Story
Share it
Top