Home > मॅक्स किसान > गुजरातमधील दूध उत्पादकांना मिळतोय सर्वोच्च दर

गुजरातमधील दूध उत्पादकांना मिळतोय सर्वोच्च दर

गुजरातमधील दूध उत्पादकांना मिळतोय सर्वोच्च दर
X

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असलेल्या गुजरातमधील दूध उत्पादक शेतकरी सध्या भलतेच खुशीत आहेत कारण सर्वसाधारणपणे हिवाळ्यात दूधाचे दर कोसळत असताना सध्या तेथील सहकारी दूध संस्था शेतकऱ्यांना स्निग्धासाठी देशातील सर्वात जास्त दर देत आहेत. गुजरातमध्ये एकूण ३.६ दशलक्ष शेतकरी दूधाचा व्यवसाय करतात आणि त्यांच्या परिवारांची संख्या ४३ दशलक्ष इतकी आहे. मात्र खासगी क्षेत्रातील स्पर्धकांच्या म्हणण्यानुसार यामुळे दूध व्यवसायाची वाट लागेल आणि ग्राहकांना दरवाढीचा भूर्दंड सोसावा लागेल.

सध्या गुजरातमधील सहकारी दूध संस्था त्यांच्या शेतकरी सदस्यांना गेल्या काही महिन्यांपासुन स्निग्धासाठी एका किलोमागे ६५० ते ७०० रूपये दर मोजत आहेत. हा दर उत्तर प्रदेश मध्ये मदर डेअरी आणि देशाच्या इतर भागातील खासगी दूध संस्था जो दर देत आहेत, त्या पेक्षा कितीतरी अधिक आहे. मदर डेअरीने तर गेल्या महिन्यातील ६२५ रूपयांचा दर आता ५८५ रूपये इतका कमी केला आहे. याउलट गांधीनगरमधील सहकारी दूधसंस्थेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ६५० रूपये दिलेला दर एप्रिल २०१७ मध्ये वाढवून ६७५ रूपये केला होता. तर गेल्या महिन्यात आणखी वाढवून आता ७०० रूपये केला आहे.

खासगी दूध संस्थांच्या तज्ञांनुसार गुजरातमधील १८ सहकारी दूध संस्था उन्हाळ्याच्या तुलनेत चारा मुबलक असताना आणि दूधाचे उपादन वाढले असुनही चढ्या दराने शेतकऱ्यांना किं

मत देत आहेत. सध्या दूधाचे उत्पादन वाढले असून जवळपास एक लाख टन दूधाच्या भूकटीचा साठा उपलब्ध आहे. गुजरातमधील विविध दूध संस्थांचे नेते राजकारणातही सक्रीय असण्याचा तसेच सध्या गुजरातमध्ये निवडणूका असण्याचा या दरवाढीशी संबंध असण्याची शंका निर्माण करत आहे. दूसरीकडे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ जो अमुल नावाने दूध उत्पादने वितरीत करतो, त्याचा गेल्या ५ वर्षातील नफा ११ हजार ६६८ कोटींवरून तब्बल २७ हजार ८५ कोटींपर्यंत वाढला आहे. यामुळे तेथील नेत्यांना गुजरातच्या ग्रामिण अर्थव्यवस्थेवर आणि मतदारांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. यामुळेच राज्याच्या तिजोरीवर कोणताही परिणाम होऊ न देता सत्तारूढ पक्षाला या माध्यमातून पैशांचा ओघ ग्रामिण भागाकडे वळवणे शक्य होते.

अमुलने केवळ किंमतीच वाढवलेल्या नाहीत तर, गेल्या वर्षाच्या तुलनेत संकलनही १७ टक्क्यांनी वाढवले आहे. दूसरीकडे डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या पूर्वार्धाअखेर या दरात बदल होणार नसल्याचे अमुल जिल्हा दूध डेअरीच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे.

गुजरातच्या ३३ जिल्ह्यांमध्ये १८ हजार ५०० सहकारी दूध संस्था आहेत आणि तेथील दूध उत्पादक कर्नाटक आणि महाराष्ट्राप्रमाणे दूधाला प्रति लिटर ३ रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करत आहेत.

दूधामागचे राजकीय गणित

देशाच्या दूध क्षेत्रात अमुलाग्र बदल करणारे अमुलचे संस्थापक वर्गिस कुरीयन यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या प्रयत्नांमध्ये राजकीय प्रभाव पडणार नाही, याची काळजी घेतली होती. मात्र राजकारण्यांनी हळुहळु या क्षेत्रात प्रवेश करून आपली मुळे घट्ट केली आहेत. गुजरातच्या आरोग्य, पर्यावरण आणि शहरी विकास खात्याचे राज्य मंत्री शंकर चौधरी हे बनासकाठा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आहेत. ते आणि या दूधसंघाचे उपाध्यक्ष मावजी देसाई हे या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार आहेत. तसेच पंचमहल सहकारी दूध संघाचे अध्यक्ष जेठाभाई अहिर हे सुद्धा भाजपाचे यावेळी उमेदवार आहेत.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आणंद मिल्क युनियन (अमुल) चे अध्यक्ष रामसिंह परमार यांनी अलिकडेच पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र याच दूध संघाचे उपाध्यक्ष आणि आमदार राजेंद्र सिंह हे कॉंग्रेसमध्येच राहणार असून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. सन २०१३ मध्ये राजकोट दूध संघाचे अध्यक्ष गोविंद रणपारीया यांनी खासदार विठ्ठल रडादीया यांच्यासोबत कॉंग्रेस सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Updated : 28 Nov 2017 8:56 AM GMT
Next Story
Share it
Top