Home > मॅक्स किसान > 'कर्जमाफीची ऐशीतैशी बँकांमुळेच'

'कर्जमाफीची ऐशीतैशी बँकांमुळेच'

कर्जमाफीची ऐशीतैशी बँकांमुळेच
X

राज्यात कर्जमाफी जाहिर होऊन देखील शेतकऱी आत्महत्यांचे सत्र अजुनही थांबलेले नाही. राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही १२५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय, यातल्या निम्म्या आत्महत्या या विदर्भात झाल्यात, यावर बोलताना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी याचं खापर बँकांच्या कारभारावर फोडलं आहे. या संदर्भात शेतकरी बँकांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचे तीनतेरा केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीची ऐशीतैशी याच बँकानी केली, अशा कठोर शब्दांत किशोर तिवारी यांनी कर्जमाफीचे खापर बँकांवर फोडले आहे, तसंच बँकांना सक्ती केली नाही, तर १०० टक्के शेतकऱ्यांचे सातबारा कोरे केल्यावरंही बँका १० टक्के शेतकऱ्यांनाही नव्यानं पीक कर्ज देणार नाही, असंही किशोर तिवारी यावेळी म्हणाले.

Updated : 14 Nov 2017 2:49 PM GMT
Next Story
Share it
Top