Home > मॅक्स किसान > ऐतिहासिक फसव्या कर्जमाफीची १० प्रमुख कारणे

ऐतिहासिक फसव्या कर्जमाफीची १० प्रमुख कारणे

ऐतिहासिक फसव्या कर्जमाफीची १० प्रमुख कारणे
X

तुम्हाला माहित आहे का कर्जमाफी का फसली… पाहा १० प्रमुख कारणे

राज्यसरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असे जाहीर केले परंतु अद्याप शेतकऱ्यांना बँकेतून कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफी फसण्याची काही महत्त्वाची कारणे आहे ते तुम्हांला माहित आहे का?

शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारला कर्जमाफी करावी लागली परंतु ती कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली का? आणि का नाही मिळाली याची नेमकी काय कारणे आहेत पाहुयात...

१. आर्थिक तरतूद न करता कर्जमाफीची घोषणा -

शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळे राज्य सरकारने आर्थिक तरतूद न करता कर्जमाफीची घोषणा केली. तसेच निधीची तरतूद न करता शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं. यावरुन कर्जमाफीची सुरुवातच शून्य नियोजनातून झाल्याचं दिसतंय.

२.कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही सरकारची भूमिका ठाम नव्हती, वारंवार कर्जमाफीचा जीआर बदलण्यात आला.

३. कर्जमाफी करताना ऑनलाईन पद्धतीच्या अटी लागू केल्या- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगितल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

ऑनलाईन पद्धतीत आलेल्या त्रुटी

- ऑनलाईन अर्ज भरण्यास अनिर्वाय केल्यानं सर्वांत प्रथम मुद्दा येतो तो इंटरनेटचा, गावात नेटवर्कचा मोठा प्रश्न आहे, यामुळे रात्रंदिवस शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे रहावे लागले.

- वेबसाईट सुरुच होत नाही.

- शेतकऱ्यांना इंग्रजीत अर्ज भरणे कठीण होते.

- अनेक शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे अडचणी वाढल्या.

- अर्ज भरण्यास सरकारी केंद्र गावात उपलब्ध नव्हते

- कागदपत्र नसल्याने अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले.

४. कर्जमाफीची अंमलबजावणी करताना बँकांच्या याद्या आणि ऑनलाईन अर्ज यांच्यात तफावत.

५. कर्जमाफीचा खरा आकडा सरकारला कळलाच नाही.

६. कर्जमाफी दिली परंतु बँकेत पैसाचं आला नाही.

७. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली परंतु त्यावर कर्जमाफीच्या रक्कमेचा आकडा नाही.

८. बँकांना सरकाने कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी आणि पैसे पाठवले नाही.

९. कर्जमाफीची यादी जाहीर केली परंतु एकाच आधारक्रमांकांचे अनेक शेतकरी.

१०. यादीत नावांचा मोठा घोळ

शेतकरी कर्जमाफी फसण्याची ही मुख्य कारणं आहेत.

Updated : 26 Oct 2017 3:50 PM GMT
Next Story
Share it
Top