उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वैजापुरात डब्यांसह अटक

200

औरंगाबाद जिल्ह्यातला वैजापूर तालुक्यात उघड्यावर शौचास बसणं काही जणांना चांगलंच महागात पडलंय. सवयीप्रमाणे तालुक्यातील अनेकजण हातात डब्बे घेऊन मोकळ्या जागेत आले होते. पण डब्बा खाली ठेऊन बसायच्या आधीच पोलिसांनी धरपकड सुरू केली आणि डब्यांसह 33 जणांना अटक करण्यात आली.

वैजापूर नगरपालिकेचं गुडमॉर्निंग पथक आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. यात पकडलेल्या नागरिकांवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोर्टानं या सर्वांना प्रत्येकी चारशे रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील २००३ लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. परंतु अनेकांनी शौचालय बांधले नाही. त्यामुळे अशा लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असे, नगरपालिकेतर्फे सांगण्यात आले