Home > Max Political > चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लढत

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लढत

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लढत
X

विधानसभा निवडणुकीच्या रींगणात चाळीसगाव मतदारसंघात यंदा राष्ट्रवादिसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. राजीव देशमुख यांचा कार्यकाळ वगळता या मतदार संघात भाजपचेच वर्चस्व होते. २००९ मध्य़े या मतदार संघातुन राजीव देशमुख यांनी बाजी मारली होती. पंरतु २०१४ च्या निवडणुकीत भाजपानं उन्मेश पाटिल या नव्या कोऱ्या चेहऱ्याला या मतदार संघातुन उमेदवारी दिली. या संधीच सोन करत उन्मेश पाटिल यांनी राजीव देशमुख यांचा पराभव केला.

पंरतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाकडुन मंगेश चव्हाण यांना तिकीट दिलय. सद्यस्थीतीत आमदार असलेले उन्मेश पाटिल जळगाव मतदारसंघाचे खासदार झाले आहेत त्यामुळे मंगेश चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं. राजीव देशमुख यांच्यासाठी यंदाची निवडणुक जड जाणार आहे कारण चाळीसगाव मतदार संघात मंगेश चव्हाण यांनी आपला चांगला जनसंपर्क तयार केलाय.

Updated : 19 Oct 2019 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top