मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं – नितेश राणे

“विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारणार आणि जनतेला न्याय मिळून देणार हीच आमची रणनीती आहे.” अशी भुमिका भाजप (BJP) नेते नितेश राणे (nitesh rane)यांनी व्यक्त केली आहे.

“युद्धामध्ये यश अपयश हे असतंच अशावेळी चिंता करायची बाब नसते. भारतीय जनता पक्ष हा आता विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष म्हणून जे काही प्रश्न विचारायचे आहेत. जे काही आक्रमण करायचं आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.” असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा…

‘हे’ सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल – छगन भुजबळ
या दोघांनी ‘करून दाखवलं’!
हे तेच अजित पवार आहेत का?

सोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार याविषयी विचारले असता “मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं. विधानसभेमध्ये येऊन १८ ते २० तास मुख्यमंत्री म्हणून काम करणं याचा अनुभव उद्धव ठाकरे घेतील.” अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.