Home > मॅक्स मार्केट > राज ठाकरेंच्या 'परतीच्या पावसाने' भाजप घायाळ

राज ठाकरेंच्या 'परतीच्या पावसाने' भाजप घायाळ

राज ठाकरेंच्या परतीच्या पावसाने भाजप घायाळ
X

राज ठाकरे यांनी आज फेसबूक पेजवर ‘परतीचा पाऊस’ म्‍हणून व्यंगचित्र टाकत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना लक्ष्य केले आहे. या व्यंगचित्रात सोशल मीडियाचा वापर करून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षावर बुमरँग झाल्याचे दाखवले आहे. यापूर्वीही राज यांनी सोशल मीडिया भाजपवर बुमरँग होत आहे, म्‍हणून भाजपची खिल्‍ली उडवली होती.

राज यांनी या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह आणि अरुण जेटली यांची व्यंगचित्रे रेखाटली आहेत. राज यांनी व्यंगचित्रात आकाशात ढग दाखवले आहे. यात सोशल मीडियारुपी वादळी पाऊस येत असल्याचे दाखवले असून या पाऊसाने मोदींसह, अरूण जेटली आणि अमित शहा भिजत असल्याचे दाखवले आहे.

Updated : 9 Oct 2017 12:49 PM IST
Next Story
Share it
Top