Home > गोष्ट पैशांची > गरज अर्थसाक्षरतेची…

गरज अर्थसाक्षरतेची…

गरज अर्थसाक्षरतेची…
X

आजच्या घडीला आर्थिक साक्षरतेचा अभाव ही समस्या फक्त उभरत्या किंवा विकसनशील अर्थव्यवस्थांमध्येच नाही तर विकसीत अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा आहे. भारतात जवळपास ६६ कोटी जनतेचे वय सरासरी ३० वर्ष किंवा त्या खालील आहे. हिच लोकसंख्या जसजशी कमावती होत आहे तसतशी त्यांची आर्थिक साक्षरता वाढणे सुद्धा नितांत गरजेचे आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्या पैशांची गुंतवणूक आणि त्याची सुरक्षा याबाबतची माहिती असणे. त्यासाठीच फिनान्शिअल मार्केट आणि या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या वैध पर्यायांची माहिती असणे. तसंच या पर्यायांचा परतावा आणि जोखिमांचा अभ्यास करून आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असणे. पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांकडे वळलेच पाहिजे. या सर्व गोष्टी कळणे म्हणजे आर्थिक साक्षरतेची सुरुवात म्हणता येईल. तसा हा विषय फार मोठा आहे. तसंच त्याला अनेक कंगोरे सुद्धा आहेत.

आपल्या जीवनात आपल्या गरजा सतत बदलत जातात. या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जसं आर्थिक पाठबळ आवश्यक असते तसंच त्याचं नियोजनही महत्त्वाचं असतं. नियमित बचतीतून गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडणे हेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठीच या आठवड्यापासून अक्षय्य तृतियाच्या मुहूर्तावर आम्ही हे खास सदर वाचकांसाठी सुरू करत आहोत.

यामध्ये आपण गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा करणार आहोत. ते निवडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा सांगणार आहोत.

१) बँक फिक्स्ड डिपॉजिट

२) पोस्ट खात्याची बचत योजना

३) सोने

४) म्युच्युअल फंड

५) शेअर्स

६) बॉण्ड

७) स्मॉल सेव्हींग स्किम्स

८) रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट

९) कंपनी डिपॉजिट्स

१०) पी.पी.एफ.

यासह इतर इतर पारंपरिक आणि नव्या गुंतवणूक पर्यायांची चर्चा करणार आहोत. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा या सदरात दिली जाणार आहेत.

कमलेश भगत

( लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हायपॉईंट सिक्युरेटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत.)

Updated : 27 April 2017 6:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top