Home News Update Max Impact: मॅक्समहाराष्ट्रच्या पाठपुराव्यामुळे अखेर त्या वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

Max Impact: मॅक्समहाराष्ट्रच्या पाठपुराव्यामुळे अखेर त्या वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

241
0
Support MaxMaharashtra

पालघर जिल्ह्यातील एका वीटभट्टी मजुराच्या संशयास्पद मृत्यूबाबत अखेर वीटभट्टी मालकावर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,. माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मथळ्याखाली मॅक्स महाराष्ट्रनं 3 जानेवारी 2020 रोजी ही धक्कादायक बातमी प्रसिध्द करताच या वृत्ताची श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी दखल घेऊन मृत राहुलची विधवा पत्नी वैशाली पवार हिची भेट घेतली. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 323( वेठबिगार उच्चाटन ) व अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत जॉली (शेठ) नाईक, मुकादम मधुकर पवार यांच्यावर वैशाली पवार हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यातील सापरोंडे येथील राहुल पवार यापल्या कुटूंबासह उदरनिर्वाहासाठी 10 नोव्हेंबर 2019 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातल्या अंजुरगाव इथं वीटभट्टीवर कामाला आले होते. तिथे वीटभट्टीमालकानं त्यांना जुन्या वीटा भरण्याचे काम सांगितले. पण राहुलनं आपण फक्त वीट थापण्याचं आणि बनवण्याचं काम करणार असल्याचं सांगितल्यानंतर मालकानं त्याला शिवागाळ करत मारहाण केल्याचा आरोप राहुल यांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांनी राहुल पवार यांचा अपघात झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं.

तसंच प्रकृती गंभीर असल्यानं राहुल यांना ठाण्याच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथं उपचारादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून वीटभट्टी मालकानंच त्याच्या गुंडांनी आपल्या नवऱ्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्याला 21 नोव्हेंबर 2019 रोजी गाडीखाली ढकलून दिल्याचा आरोप राहुलच्या पत्नीनं केला होता.

हे ही वाचा

अतिउत्साही नेत्यांना आवरा, शिवेंद्रराजे संतापले

छत्रपतींशी मोदींची तुलना केल्यानं बच्चू कडू संतापले

‘त्या’ पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

पोलिसात तक्रार केली तर तुमचाही जीव घेईन अशी धमकी वीटभट्टी मालकानं दिल्याचा आरोप मृत राहुल यांची बहिण गीता गुरूनाथ सवरा यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला होता या नंतर राहुल पवार यांच्या पत्नीनं 18 डिसेंबर1019 रोजी थेट पालघरच्या एसपींनाच पत्र लिहून फौजदारी कारवाईची मागणी केली होती. परंतु याकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.

त्यानंतर मॅक्समहाराष्ट्रने याबाबतच वृत्त प्रसिद्ध करताच श्रमजीवी संघटनेने दखल घेऊन जॉली शेठ नाईक व मुकादम यांच्यावर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997