अखेर पुनमच्या कुटूंबियांना मिळाले रेशनकार्ड

अखेर पुनमच्या कुटूंबियांना मिळाले रेशनकार्ड

162
0

पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषणग्रस्त पूनमच्या कुटुंबियांना अखेर रेशनकार्ड मिळालं आहे. तहसीलदार विजय शेट्ये यांनी घाटाळ कुटुंबाकडे रेशनकार्ड सुपूर्द केलं. ‘मॅक्स महाराष्ट्र’ने २० ऑगस्टला यासंदर्भातील विशेष रिपोर्ट प्रकाशित केला होता.

‘त्या’ चिमुकलीसोबत प्रशासनालाही कुषोषणाची लागण

पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषणग्रस्त पूनम चौधरी हिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. तिच्या कुटुंबाची सरकार दप्तरी कोणतीच नोंद नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा कोणताच लाभ मिळत नव्हता. तिच्या वडिलांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दुसऱ्याच्या घरी राहून आयुष्य काढावं लागत होतं. कुपोषणाबरोबर दारिद्र्याचे भयाण वास्तव आणि प्रशासकीय यंत्रणांची उदासीनता ‘मॅक्स महाराष्ट्र’ने दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

या रिपोर्टनंतर तहसीलदार विजय शेट्ये यांनी तात्काळ दखल घेऊनपूनमच्याकुटूंबियांची भेट देत २ दिवसांत रेशनकार्ड देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि त्यानुसार आता त्यांना रेशनकार्ड देण्यात आलंय.

तीव्र कुपोषित असलेली पूनम श्रमजीवीच्या बाल संजीवनी केंद्रात उपचार घेत असून तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे तिच्या आई गंगुबाई चौधरी यांनी सांगितलं. या सर्व पाठपुराव्याबद्दल त्यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’चे आभार मानले.