Home > मॅक्स किसान > #माझंमत – इतर सर्व वाचकांची एकत्रित मतं

#माझंमत – इतर सर्व वाचकांची एकत्रित मतं

#माझंमत – इतर सर्व वाचकांची एकत्रित मतं
X

मॅक्स महाराष्ट्रच्या इतर वाचकांनी शेती संदर्भात नोंदवलेली मते

शेती व इतर व्यवसायांची तुलना होऊ शकत नाही. शेतीचे प्राधान्य सर्वांना मान्य करावे लागेल. खेड्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. स्वच्छ पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कमी दरात वीज उपलब्धता त्याचबरोबर स्थानिक पुरक व्यवसाय, कमी व्याजाने अथवा बीनव्याजी भांडवल उपलब्धता, बियाणे आणि खतं रास्त भावात मिळावीत

  • पुष्पा पाटील

शेतकऱ्यांच्या प्रश्नामागे,शेतीच्या आजच्या अवस्थेमागे अनेक कारणे आणि उपाय असतील. पण मूळ कारण हे भारतीय संविधानाची अंमलबजावणी चोख तंतोतंतपणे न होणे हेच आहे. भारतीय संविधानाची चोख अंमलबजावणी होणे हाच मूळ उपाय आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय संविधनाविषयी जनजागृती निर्माण केली पाहिजे. संविधान मूल्ये जनमानसात रुजवली गेली पाहिजेत. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून रोज किमान एका कलमाचा लोकांना परिचय होईल असा एखादा कार्यक्रम दाखवला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं प्रत्येक भारतीयाने संविधान निष्ठ बनलं पाहिजे. कृतिशील भारतीय झालं पाहिजे.

  • निनावी

आज शेतीची जी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे त्याला शेतकरी स्वतःच जबाबदार आहे. कसायाला गाय धार्जिनी तसे शेतकरी लबाडांच्या गळाला लागले आहेत. ज्यांना शेतकऱ्याविषयी काडीमात्र आस्था नाही त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर शेतकरयांनी धोंडा पाडून घेतला. लोकसभा निवडणूकीपूर्वी गेल्या दहा वर्षात जे कमावलं ते या तीन वर्षात गमावलं अशी स्थिती आहे. शेटजी-भटजींचा पक्ष कष्टकरयांसाठी काही करील ही अपेक्षाच फोल आहे.

  • उल्हास पाटील

खरंतर शेतकरी जगाला पाहिजे परंतू आज जी शेतमालाची आवस्था आहे ती भयानक आहे. याला जबाबदार दुसर कोणी नसून मध्यम वर्ग व शहरी लोक आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुळ कारणीभूत आहे. माणसाच्या मुलभूत गरजा अन्न वस्त्र व निवारा आहे अन्न खाऊन माणूस जगतो. पण, त्याला त्याची किंमत नाही उलट चांगळवाद फोफावल्यामुळे तो भौतिक सुखाच्या मागे कृत्र्यागत पळतो आहे. त्याला भाजी पाला फुक्कट पाहिजे. तसंच शेतमात विक्री व्यवहार यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. त्यात सुधारणा करून भ्रष्टाचार थांबवला पाहिजे.

  • यमाई

सावकारी कायदा २०१४ची प्रभावी अमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे - अरुण इंगळे, प्रदेशाध्यक्ष, सावकारग्रस्त शेतकरी समिती, बुलडाणा

Updated : 22 April 2017 4:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top