…तर यंदा नागपूरची संत्री खायला मिळणार नाही

You will not get Nagpur's oranges this year

215

महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागपूर जिल्ह्यामध्य़े मोठ्या प्रमाणात संत्राचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, यंदाच्या पावसाने संत्रा व मोसंबीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील संत्रा व मोसंबी पिकांची गळ व्हायला सुरुवात झाली आहे. पावसाच्या अनुकूल वातावरणात तयार होणाऱ्या ‘कलेटीव्ह फ्रिकम फंगल’ मुळे ही गळ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल व सावनेर तर अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत असून हातातोंडाशी आलेले पीक गळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या संदर्भात आम्ही पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांच्याशी बातचित केली.

‘कलेटीव्ह फ्रिकम फंगल’ च्या प्रादुर्भावामुळे ही गळ होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पर्यंत 40% संत्रा मोसंबी ची गळ झाली असून वेळीच फवारणी च्या उपायोजना केल्या नाही. तर ही गळ शंभर टक्क्यावर जाईल. अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यामुळे या हंगामातील जवळपास चारशे कोटीच्या संत्रा व मोसंबी व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments