Home > मॅक्स किसान > कृषी सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध

कृषी सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध

कृषी सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध
X

कृषी सुधारणाला विधेयकाला देशात का होतोय विरोध? नेमकं हे विधेयक काय आहे? पाहा अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर यांचं विश्लेषण

लोकसभेने मंजूरी दिलेल्या कृषी संबंधी 3 विधेयकाचा देशात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. विशेष बाब म्हणजे भाजप चा जुना सहकारी मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यानं या विधेयकाला विरोध म्हणून राजीनामा दिला आहे.

कोणते आहेत हे विधेयक?

1. जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक

केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थांच्या साठेबाजीला प्रतिबंध नसेल. याचा अर्थ व्यापारी आता धान्य, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाट्याचे अमर्यादा साठा करु शकतील.

2. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक

यामध्ये विधेयकात कृषी माल बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी आणि विक्रीची मुभा मिळणार आहे.

3. हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक

यामध्ये करार शेतीला वैध ठरवले जाणार आहे. यात मोठे व्यावसायिक आणि कंपन्या करारावर शेतजमीन घेऊन शेती करु शकणार आहेत.

मात्र, या तीन विधेयकाचा देशात मोठ्या प्रमाणात विरोध का होत आहे. नक्की या विधेयकात कोणत्या तरतूदी करण्यात आल्या आहेत? या विधेयकाचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा? या संदर्भात अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी केलेली बातचीत नक्की वाचा...

Updated : 19 Sep 2020 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top