बोगस बियाणे: काय घडलं कोर्टात?

राज्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. वृत्तपत्रात या संदर्भात आलेल्या वृत्ताची दखल घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात सुमोटो याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने बोगस बियाणांची दखल घेतल्याने बियाणे कंपन्यांची दाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर बियाणे निरिक्षकांची देखील धांदल उडाली आहे. न्यायालयाने या संदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागितली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटणाऱ्या माणिक कदम यांनी देखील या संदर्भात याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करुन घेण्यात आली आहे.

मंगळवारी कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा माणिक कदम या ठिकाणी उपस्थित होते. त्यांन कोर्टात नक्की काय झालं? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रला माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here