Home > News Update > शेतीचं अर्थचक्र उलगडून सांगणारी शेतकऱ्याची मोठी मुलाखत...

शेतीचं अर्थचक्र उलगडून सांगणारी शेतकऱ्याची मोठी मुलाखत...

शेतीचं अर्थचक्र उलगडून सांगणारी शेतकऱ्याची मोठी मुलाखत...
X

एरवी तुम्ही राजकारण्यांची ‘दणदणीत, रोखठोक’ अशा गोंडस नाव दिलेली मुलाखत आवडीने पाहतात. मात्र, एखाद्या शेतकऱ्याची शेतीचं गणित उलगडून सांगणारी मोठी मुलाखत पाहिली आहे का? पाहा मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी घेतलेली एका शेतकऱ्याची मोठी मुलाखत

कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे अगोदरच तोट्यात असणाऱ्या शेतीचा कणाच मोडून गेला आहे. मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. त्या दरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका वृद्ध शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांच्याशी बातचित केली.

वृद्ध शेतकरी मधुकर सांगतात मी नोकरीला होतो. नोकरी सोडून शेती करायला लागलो. आता शेतीत काही परवडत नाही. आता, वय झाल्यानं दुसरं काही करता येत नाही. त्यामुळं शेती करावी लागते. शेती भरपूर आहे. मात्र, पैसा नाही. शेतकऱ्यांना सगळे लुटतात. शेती मालाचा भाव व्यापारी ठरवतात.

मधुकर सांगतात, कोरोना ने शेतीचं मोठं नुकसान झालं पण एक फायदा झाला, लोकांचे मोठं मोठे होणारे लग्न छोटे झाले. त्यामुळं खर्च वाचला. शेतकऱ्याचं अर्थशास्त्र सुधारण्यास मदत झाली. मात्र, शेतकरी जेवढं कमवतो त्याला शेतीतच खर्च करावं लागतं. व्यापारी शेतकऱ्याच्या मालाची किंमत करत नाही.

सरकारने मदत करायला हवी. शेतकरी तगला तरच हा देश वाचवू शकतो. सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला हवी. तरच शेतकरी उभा राहू शकतो. शेतीची अधिकारी गावाकडं कधी येतात आणि कधी जातात हे कळत नाही. 10 गावाला मिळून एक अधिकारी आहे. त्यामुळं शेती आपल्यालाच विचार करुन करावी लागते. शेतीचे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळं शेतकऱ्याला कोणतं पीक घ्यावं याचं मार्गदर्शन मिळत नाही.

सध्या शेतीची वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत कोरोना आहे. तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असं मधूकर सांगतात. पाहा काय म्हणाले मधूकर

Updated : 19 Jun 2020 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top