Home > मॅक्स किसान > हमी भावापेक्षा कमी भाव, कशी होणार कर्जमुक्‍ती?

हमी भावापेक्षा कमी भाव, कशी होणार कर्जमुक्‍ती?

हमी भावापेक्षा कमी भाव, कशी होणार कर्जमुक्‍ती?
X

महाराष्ट्रात आजपासून कापूस खरेदीला सुरूवात झालीय. मात्र, हमी भावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यानं सरकारला करायची असलेली कर्जमुक्‍ती कशी होणार असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलाय.

गेल्या वर्षी कापसाचा भाव पाच हजार तीनशे एवढा होता. यंदा तो चार हजार तीनशे वीस इतका कमी झालाय. कमी हमीभाव मिळत असल्यानं तो कर्ज कसं फेडणार. उलट तो आणखी कर्जात बुडेल. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करायचं असल्याचं सांगतं आणि दुसरीकडे कमी हमीभाव देऊन त्याला आणखी कर्जात बुडवतंय, अशी दुटप्पी भूमिका सरकारची असल्याचा आरोप जावंधिया यांनी केलाय. त्यातही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस सरकार खरेदी करणार आहे. बोनसच्या विरोधात असलेल्या केंद्र सरकारनं यंदा गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाचशे रूपये बोनस जाहिर केला आहे.

शेतकऱ्यांचा विकास करायचा असल्यास पाचशे रूपयांनी काहीच होणार नाही. जर सरकारला शेतकऱ्यांना खरंच कर्जमुक्‍ती द्यायची असेल तर किमान पंधराशे रूपये बोनस द्यावा, अशी मागणीही जावंधिया यांनी केलीय.

Updated : 25 Oct 2017 12:21 PM GMT
Next Story
Share it
Top