Top
Home > मॅक्स किसान > सुकाणू समितीमुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

'सुकाणू समितीमुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही'

सुकाणू समितीमुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
X

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तेव्हा या सरकारने कर्जमाफी केली. मात्र ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका सगळीकडून होत आहे.

दरम्यान कर्जमाफीसाठी सुरूवातीला शेतकऱ्यांचे संप सुरू झाले मात्र या संपात महत्त्वाची भूमिका बजावली ती जयाजी सुर्यवंशी यांनी. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून संप मध्यावर असतानाच रात्री शेतक-यांचा संप माघे घेण्याची घोषणा जयाजीने केली, त्यामुळे जयाजीवर सर्व वर्गातून टीका होण्यास सुरूवात झाली. तेव्हा पासून शेतक-यांचा नेता म्हणून बिरूद मिरवणारा जयाजी एका क्षणात शेतक-यांच्या दृष्टीकोणातून खलनायक ठरला.

जयाजीला कोणी संपवल? महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीबाबत जयाजीचे मत काय? सुकानू समितीबद्दल जयाजीने काय वक्तव्य केले आहे पाहा हा व्हिडिओ...

Updated : 24 Oct 2017 8:11 AM GMT
Next Story
Share it
Top