Home > मॅक्स किसान > सिमंेटच्या जंगलात राहणाऱ्यांना खेड्याची ओढ...

सिमंेटच्या जंगलात राहणाऱ्यांना खेड्याची ओढ...

सिमंेटच्या जंगलात राहणाऱ्यांना खेड्याची ओढ...
X

सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांची आता गावाकडे ओढ वाढतेय, शहरापासून लांब शेतात जावून राहायला लोकांना आव़डायला लागलंय, यातूनच कृषी पर्य़टनाचा जन्म झाला. शेतकऱ्यांना शेती करताना पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्य़टन सुरु करता येतं, कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचं एक साधन मिळतं.

शेतकऱ्यांनी हे कृषी पर्यटन कसं सुरु करायचं, त्यासाठी काय गरजेचं आहे, कृषी पर्यटनाचं अर्थशास्त्र काय? याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नागपूरात आज एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. इंडो इस्त्राईल कृषी विकास संस्था आणि महाराष्ट्र अँग्रो – रुरल फेडरेशनच्या वतीनं या कार्यळाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेत कृषी पर्यटनातली खाद्य संस्कृती, अर्थकारण यासारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.

विदर्भात कृषी पर्यटनाला चांगली संधी आहे, असं मत यावेळी महाराष्ट्र अँग्रो – रुरल फेडरेशनचे संचालक सुनिल मानकीकर यांनी व्यक्त केलं. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली गजानन उमाटे यांनी

Updated : 25 Oct 2017 7:27 AM GMT
Next Story
Share it
Top