Home > मॅक्स किसान > साखरेच्या किंमतीवरून कारखानदारांमध्ये चिंता

साखरेच्या किंमतीवरून कारखानदारांमध्ये चिंता

साखरेच्या किंमतीवरून कारखानदारांमध्ये चिंता
X

राज्यात गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना होत नाही तोच काही साखर कारखान्यांनी बाजारातील दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री सुरू केल्यामुळे इतर साखर कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बाजारातील साखरेला सध्या टनामागे ३ हजार २८० ते ३ हजार ४५० रूपये इतका दर मिळत आहे मात्र साखर कारखान्यांनी किमान ३ हजार ४०० रूपये दर मिळाल्याशिवाय साखर विकायची नाही, असे ठरवले आहे. कमी दरात साखर विक्री केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे चुकवता येणार नाहीत, या विचारानेच अनेक कारखान्यांनी टनाला ३ हजार ४०० रूपये दर मिळाल्याशिवाय साखर न विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही साखर कारखान्यांनी पैशांची कमतरता भेडसावत असल्यामुळे बाजारातील दरापेक्षा कमी दराने साखर विकण्यास सुरूवात केली आहे. यामुळे इतर कारखान्यांनी नुकसान होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

यंदा साखरेच्या हंगामाला सुरूवात झाल्यापासुनच साखरेच्या दरात टनामागे १२० रूपयांची घसरण झाली आहे. त्यातच काही कारखाने या दरापेक्षाही कमी किंमतीने साखर विकत असल्यामुळे इतरांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील काही साखर कारखान्यांनी हा प्रकार सुरू केला आहे. या कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल चूकवण्यासाठी पैशांची कमतरता भेडसावत असल्यामुळे त्यांनी कमी दरात साखर विक्री सुरू केली आहे.

मुंबई साखर व्यापारी संघटनेचे सचिन मुकेश कुवाडीया यांनी दिलेल्या माहितीनुसार काही साखर कारखानेच हा प्रकार करत आहेत. पश्चिम भारत साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बीबी ठोंबरे यांनीही असा प्रकार सुरू असल्याचे आणि आम्ही कारखान्यांना ३ हजार ४०० रूपयांपेक्षा कमी दराने साखर न विकण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले.

काही नव्या साखर कारखांन्यांनी हा प्रकार सुरू केला आहे करण त्यांचे गाळप हंगाम छोटे असतात. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांनी किंमत देण्यासाठी पैशांची लगेचच गरज असते. मात्र शेतकरी अशा कारखान्यांवर सहसा विश्वास ठेवत नाहीत. अशा कारखान्यांचा गळीत हंगाम जानेवारीत संपेल. त्यानंतर साखरेच्या किंमती स्थिर होतील, असे पश्चिम महाराष्ट्रातील एका साखर कारखानदाराने सांगितले.

Updated : 1 Dec 2017 4:16 AM GMT
Next Story
Share it
Top