Home > मॅक्स किसान > तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित
X

तामिळनाडूच्या कावेरी नदी पट्ट्यातले शेतकरी गेला १ महिनापेक्षा जास्त काळ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत होते. पण, त्यांनी आता त्यांचे आंदोलन २५ मे पर्यंत स्थगित केलं आहे. उशीरा का नाही जाग आलेले तामिळनाडूचे मुखमंत्री पालानीसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नंतर त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. संध्याकाळी उशीरा आंदोलकांनी त्यांच आदोलन स्थिगत करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ जनकल्याण मार्ग (पूर्वीचं ७ रेसकोर्स) पर्यंत आपली हाक पोहचावी यासाठी या शेतकऱ्यांनी काय-काय नाही केलं ते सांगा. मृत शेतकऱ्यांच्या कवट्या आणल्या, अर्ध मुंडन केलं, स्वतःची प्रेतयात्रा काढली, जमिनीवर जेवले, उंदीर खाण्याचं आंदोलन केलं, पुरूषांनी महिलांच्या साड्या नेसल्या, नग्न होऊन सुद्धा आंदोलन केलं होतं. ३९ दिवसांनंतर सुद्धा सरकार ऐकत नाही म्हंटल्यावर त्यांनी मुत्राप्राशन आंदेलन केलं होतं.

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे तामिळनाडूत शेतकरी आत्महत्या करत आहेत. आतापर्यंत ४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची त्यांची मागणी आहे. ही कर्ज साधारण ५० हजार ते १ लाखांच्या आसपास आहेत.

दुष्काळी मदत मिळावी, म्हाताऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, स्वस्त पिककर्ज मिळावं, शेतमालाला योग्य भाव मिळावा, सिंचनासाठी नद्या जोडाव्यात. कावेरी जल बोर्ड स्थापन करावं अशा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

सरकार आणि मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे शेतकरी रस्त्यावर जेवले.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटावं म्हणून या शेतकऱ्यांनी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये विवस्त्र आंदोलन केलं होतं.

या शेतकऱ्यांनी स्वतःची प्रेतयात्रा सुद्धा काढली होती.

आता हे शेतकरी 25 मे पर्यंत वाट पाहणार आहेत. तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशार त्यांनी दिला आहे.

Updated : 23 April 2017 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top