Home > मॅक्स किसान > 'शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित राहावेत म्हणून जाचक अटी'

'शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित राहावेत म्हणून जाचक अटी'

शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित राहावेत म्हणून जाचक अटी
X

शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित राहावेत म्हणून सरकाने जाचक अटी लागू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीच्या विरोधात आहेत. त्यांना अजूनही सरसकट कर्जमाफी द्यायची नाही. अधिकाधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहावेत, म्हणूनच त्यांनी जाचक अटी घातल्या, आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रासह देशातील घडामोडीसंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटींची तरतूद केली आहे. ते पैसे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीशी संबंधित बाबींसाठीच खर्च झाले पाहिजेत. ते पैसे अन्यत्र वळवल्यास आमचा त्यास विरोध असेल. सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले, केंद्र व राज्यातील सरकारच्या धोरणामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार, तरुण, उद्योजक यांच्यामध्ये सरकारविरोधी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे देशात सध्या भाजपाला उतरतीकळा लागली आहे असेही ते म्हणाले. अमित शहा यांच्या मुलाची कंपनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी सुरु करण्यात आली होती. असा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २००४ मध्ये सुरु झालेल्या कंपनीची उलाढाल देशातील सरकार बदलल्यावर अचानक कोटींच्या घरात कशी काय गेली? हा मनी लाँड्रींगचाच प्रकार आहे. याप्रकरणी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. नोटाबंदी ही पंतप्रधानांचा अविचारी निर्णय आहे. देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जीएसटीचा निर्णयही घाईने घेतला त्यामुळे उद्योग, व्यापार अडचणीत आला आहे. कर किती प्रमाणात असावा याचे सूत्रच राहिलेले नाही. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Updated : 20 Oct 2017 9:36 AM GMT
Next Story
Share it
Top