Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्यास सुरुवात- सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्यास सुरुवात- सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्यास सुरुवात- सदाभाऊ खोत
X

राज्यातील शेतकरी संपाची वाढती तीव्रता पाहता शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टिने हालचाल सुरु झाल्या आहेत. राज्यातील व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या पिक कर्जाची माहिती संकलित करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली आहे अशी माहिती कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. कर्जाची माहिती संकलित करण्यासाठी गठित करण्यात आलेली उपसमिती शेतकऱ्यांना किती रक्कमेपर्यंत कर्जमाफी दयायची शासनाच्या तिजोरीवर किती भार पडेल याची माहिती सरकारला देणार. ही उपसमिती पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर व्यवस्थापक, राष्ट्रीय सुचना केंद्राचे पुणे व मुंबईचे प्रतिनीधी, अर्थसंचालनालय उपनिबंधक यांचा या समितीचे सदस्य म्हणून समावेश असणार आहे.

एक हेक्टर पर्यंत जमिन असलेले सिमांत शेतकरी, 1 ते 2 हेक्टर पर्यंत जमिन असलेले लहान शेतकरी आणि दोन हेक्टर पेक्षा अधिक जमिन असलेले मोठे शेतकरी अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. आंध्रप्रदेश, तेलंगाणा व उत्तर प्रदेश या राज्याने केलेल्या शेतीपीक कर्जमाफी योजनेचा अभ्यास करुन राज्यात कर्जमाफी योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बँकांकडून पिक कर्जाची माहिती आणि शेतीचे क्षेत्र व सदर क्षेत्रावर घेतलेल्या पिकाबाबतची महसूल विभागाकडील माहिती संकलित केली जाणार आहे.

Updated : 8 Jun 2017 3:00 PM GMT
Next Story
Share it
Top