Home > मॅक्स किसान > 'विषबाधेबाबत सरकार झोपा काढतंय का?'

'विषबाधेबाबत सरकार झोपा काढतंय का?'

विषबाधेबाबत सरकार झोपा काढतंय का?
X

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीतून होणाऱ्या विषबाधेबाबत सरकार झोपा काढतंय का ? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला आहे. लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला नाही, तर कृषी मंत्री आणि कृषी सचिवांच्या ऑफिसमध्ये किटकनाशकाची फवारणी करू असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच मुंबईत चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ज्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली, तशीच नुकसानभरपाई यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बच्चू कडूंनी आज यवतमाळमध्ये जाऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत २१ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार झाले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत फवारणीमुळे गंभीर स्थिती आहे. यात दारव्हा, कळंब, झरी, दिग्रस, मारेगाव, पांढरकवडा, वणी, आर्णी आदी तालुक्‍यांचा समावेश आहे. फवारणीचा फास असाच सुरू राहिल्यास आगामी काळात बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्‍यता आहे.

https://youtu.be/wq9S-jBofQc

Updated : 3 Oct 2017 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top