Home > मॅक्स किसान > विषबाधीत रूग्णांसाठी सरकारी रूग्णालयात औषधचं शिल्लक नाहीत...

विषबाधीत रूग्णांसाठी सरकारी रूग्णालयात औषधचं शिल्लक नाहीत...

विषबाधीत रूग्णांसाठी सरकारी रूग्णालयात औषधचं शिल्लक नाहीत...
X

यवतमाळ जिल्हात 19 शेतक-यांच्या मृत्यूपैकी ज्या GMC सरकारी रुग्णालयात 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 300 च्या वर शेतकऱ्यांवर उपचारल केले जात आहेत.

या रूग्णालयात सुरूवातीला उपचार करण्यासाठी शेतकरी मृत्यूशी झुंज देत असताना, इतकी मोठी आणीबाणीची परिस्थिती असताना या सरकारी रुग्णालयात काही अँटीडोट्स आणि औषधं उपलब्ध नव्हती. ही धक्कादायक बाब खुद्द मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना मान्य केली आहे.

त्यामुळे उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधं विकत आणण्यास सांगण्यात आलं. ज्या शेतकरी आणि शेतमजुरांकडे दोन वेळच्या जेवनाची सोय नाही, ज्या शेतकरी आणि शेतमजुरांकडे दोन वेळच्या जेवनाची सोय नाही, त्यांना चक्क विकत औषध आणायला लावण्याचं धाडस फडणवीस सरकारच्या यंत्रणांनी केले आहे... यावरुन शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाची गंभीरता लक्षात येते.

https://youtu.be/de2PZ91P5VQ

Updated : 6 Oct 2017 2:23 PM GMT
Next Story
Share it
Top