Home > मॅक्स किसान > राज्यात 'या' पाच बियाणांवर बंदी?

राज्यात 'या' पाच बियाणांवर बंदी?

राज्यात या पाच बियाणांवर बंदी?
X

नागपूर - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवानगी नसलेल्या जीएम बियाणे विकणाऱ्य़ा पाच बिय़ाणे कंपन्यांविरोधात नागपूरात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देशात मान्यता नसतांना राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 'Herbicide tolerant' या तंत्रज्ञानावर आधारीत जीएम बियाणे विकल्याप्रकरणी राज्याच्या कृषी आयुक्तांनी पाच बियाणे कंपन्यांवर नागपूरात एफआयआर दाखल केला आहे. बाळभद्र, जादु, एटीएम, क्रिष्णा गोल्ड आणि अर्जुन अशा या बियाणे कंपन्यांची नावे आहेत.

दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने कापूस उत्पादकांना 'जनुकीय बदल' करून बियाणे विकून होणाऱ्या लुटी संदर्भात दखल घेत जनुकीय बदल (जेनेटिकली माँडिफाईड) पद्धतीने लागवड होणाऱ्या कापसासंदर्भात एक आढावा बैठक आयोजीत केली होती. यात जवळपास आठ राज्यात ३५ लाख अशा प्रकारे कापसाचे जीएम बियाणे अवैधपणे विकल्याचं पुढे आलं आहे. यात जनुकीय बदल केलेल्या बियानांविरोधात राज्याच्या कृषी आयुक्तांनी पाच बियाणे कंपन्यांवर नागपूरमध्ये एफआआर दाखल करून या कंपन्यांनी परवानगी नसतांना हे बियाणे कसे काय विकले? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Updated : 27 Oct 2017 10:15 AM GMT
Next Story
Share it
Top