Home > मॅक्स किसान >  या सरकारमध्ये समन्वय नाही

 या सरकारमध्ये समन्वय नाही

 या सरकारमध्ये समन्वय नाही
X

यवतमाळमध्ये 19 शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यूच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना या सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका झिरोबजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांनी केली आहे. यवतमाळमधल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असं विचारले असता महाराष्ट्र राज्यसरकार, राज्यातील कृषी विद्यापीठ, आणि कृषी अधिकारी अगतिक आहेत तर राज्यातील राज्यमंत्र्यांना कृषी धोरण बदलवण्याचे अधिकार नाहीत ते फक्त कॅबिनेट मंत्र्यांना आहेत. त्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी मृत्यू प्रकरणात सरकारमधील समन्वयाचा अभाव दिसून आल्याची टीका सुभाष पाळेकर यांनी केली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असल्यास झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धती अवलंबविणे गरजेचे आहे. देशात नैसर्गिक शेती करणाऱ्या एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नसल्याचा दावा सुद्धा यावेळी सुभाष पाळेकर यांनी केला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/886607091497180/

Updated : 8 Oct 2017 2:05 PM GMT
Next Story
Share it
Top