Home > मॅक्स किसान > 'कृषी मंत्री, आरोग्य मंत्री काय करतायेत?'

'कृषी मंत्री, आरोग्य मंत्री काय करतायेत?'

कृषी मंत्री, आरोग्य मंत्री काय करतायेत?
X

यवतमाळ जिल्ह्यात विषारी कीटकनाशकांमुळे 18 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे सरकारने कर्जमाफीचे खोटं आश्वासन दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर आता दुसरीकडे कृषी विभागामार्फत प्रतिबंध असलेल्या विषारी कीटकनाशके शेतकऱ्यांना दिली जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मृत शेतक-यांची नावे दशरथ चव्हाण, देविदास मडावी, कैलाश पेंडोर, आय्युब शेख, अऩिल चव्हाण, रमेश चिरवार, रवी राठोड, विठ्ठल परकेवार, प्रदीप सोयामी, वसंत सिदम, मारोती पिंपळकर, दिवाकर घोशी, शंकर केडाम, दिपक माडवी आणि बंडू सोनुरूळे

दरम्यान या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना विचारले असता सरकारचं जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कृषी मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. अधिकाऱ्यांना लाथाळला हवं, प्रधान सचिवांना बाहेर छपराश्याची सुद्धा नोकरी मिळणार नाही. जिल्ह्यात विषारी कीटकनाशकांमुळे १८ हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेलाय, यावर प्रतिक्रिया देताना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

https://youtu.be/IOzUDvtSzws

Updated : 2 Oct 2017 9:15 AM GMT
Next Story
Share it
Top