Home > मॅक्स किसान > यंदा खरिपाचा हंगाम तोट्यात, आता रब्बीवर आशा...

यंदा खरिपाचा हंगाम तोट्यात, आता रब्बीवर आशा...

यंदा खरिपाचा हंगाम तोट्यात, आता रब्बीवर आशा...
X

भारतात या वर्षी सरासरीइतका पाऊस पडूनही खरीपाचा हमगाम तोट्यात गेला असून या हमगामात विविध कारणांमुळे धान्य उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. खरीप हंगामात झालेली तूट रब्बी हंगामात भरून काढता येईल, अशी आशा कृषी मंत्रालयाने व्यक्त केली असली तरी हवामानखात्याने परतीच्या पावसाचा आणखी एक फटका शेतीला बसण्याची शक्यता असल्याच्या इशारा शोतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणाराच आहे.

यावर्षी खरीप हंगामात एकूण 8.71 दशलक्ष टन धान्यनिर्मिती झाली तर गेल्यावर्षी याच हंगामात तब्बल रेकॉर्डब्रेक 9.42 दशलक्ष टन धान्यनिर्मिती झाली होती. म्हणजेच या हंगामात एकूण ७ लाख टन कमी धान्यनिर्मिती झाली आहे. संपूर्ण जगात भाजीपाला आणि फळउत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषकरून केळी, आंबा, लिंबू आणि पपई फत्पादनात भारत अग्रेसर आहे.

खरीप हंगामातील तूट रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा कृषी मंत्रालय व्यक्त करत असले तरी परतीच्या पावसाचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. याचा परिणाम रब्बी पाकांच्या पेरणीवर होत असल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या केवळ 4.22 टक्के क्षेत्रावरच पेरण्या आतापर्यंत झाल्या आहेत. मराठवाड्यात रब्बीचे १८ लाख 440 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ 76 हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. औरंगाहाद कृषी विभागातील ३ जिल्ह्यांमध्ये 7.28 तर लातूर कृषी विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 2.49 टक्केच क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मराठवाड्यात ज्वारीचे क्षेत्र 8 लाख 90 हजार हेक्चर इतके असले तरी आतापर्यंत केवळ 57 हजार हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे. तसेच हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र 4 लाख 26 हजार हेक्टर असले तरी प्रत्यक्षात केवळ 15 हजार 450 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

Updated : 20 Oct 2017 10:36 AM GMT
Next Story
Share it
Top