Home > मॅक्स किसान > मोदीजी, कापूस-सोयाबीनकडे लक्ष द्या!

मोदीजी, कापूस-सोयाबीनकडे लक्ष द्या!

मोदीजी, कापूस-सोयाबीनकडे लक्ष द्या!
X

महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीनच्या दरात मोठी घसरणं झालीय, केंद्र सरकारने ठरवलेल्या हमीभावापेक्षा कमी दरानं सध्या कापूस आणि सोय़ाबीनची विक्री सुरु आहे, दर पडल्यानं कापूस-सोयाबीन पिकवणारा शेतकरी संकटात सापडलाय, सोयाबीन-कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या विक्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारं पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने पंतप्रधानांना लिहीलंय.

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, खुल्या बाजारात गेल्या पाच वर्षांपासून कापूस आणि सोयाबीनच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त होत्या, पण यंदा व्यापाऱ्यांनी तांत्रिक कारणं आणि जागतिक मंदी, अशी कारणं दाखवून सोयाबीन कापसाचे दर पाडलेय, अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या एजंसीज असलेल्या (सीसीआय) कापूस महामंडळ आणि नाफेडच्या मवाळ धोरणामुळे शेतकऱ्यांची खुली लूट होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसाच्या किंमती स्थिर ठेवण्यास सीसीआय आणि नाफेडचा हस्तक्षेप फारच अपुरा आहे. 70 लाख हेक्टर्स लागवडीच्या क्षेत्रापैकी 40 लाख हेक्टर्स लागवडीचं क्षेत्र असलेले शेतकरी आज मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं किशोर तिवारी यांनी

पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवलं असून नाफेड – सीसीआयने खुल्या बाजारात सक्रिय होण्याची मागणी त्यांनी केलीय.

किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कापूस आणि पाम तेल आयात करण्यावर बंदी घालणाऱ्या आयात धोरणातील बदलासाठी व तसेच एमसीडीईएक्स आणि एनसीडीईएक्समध्ये खुल्या व्यापारात सोयाबीनची केक म्हणजे डीओसी याला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली असून सोबतच कापूस व सोयाबीन व्यापाऱ्यांना निर्यात अनुदान देण्याची मागणीही करण्यात आलीय.

Updated : 31 Oct 2017 4:35 PM GMT
Next Story
Share it
Top