Home > मॅक्स किसान > मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
X

शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत कागदी घोडे नाचवण्याचा खेळ सुरु आहे त्यामुळे कृषी कर्जमाफी योजना जाहीर होऊन ही शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीए. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात बुधवारी कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केलीय. सावनेर तालुक्यातील खाप (पाटण गावात) येथील ही घटना आहे. मनोहर ठाकरे असं या शेतकऱ्याचं नावं असून त्याच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे तीन लाख रुपयांचं कर्ज होतं शिवाय सततच्या नापिकीमुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या मनोहर ठाकरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय.

मनोहर ठाकरे २० एकर शेतीचे मालक असून या शेतीवर तीन लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या नावे होते. मात्र सततच्या नापिकीमुळे त्यांना ही कर्ज फेड करता आली नाही. राज्य सरकार तर्फे कर्ज माफीची घोषणा करुनही ठाकरे यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. विविध सरकारी निकष आणि ऑनलाईनच्या किचकट प्रक्रियेने वैतागलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नसल्याने धीर खचत आहे. आणि अशा एका अत्यंत निराशेच्या क्षणी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवत आहेत.

Updated : 10 Nov 2017 11:47 AM GMT
Next Story
Share it
Top