Home > मॅक्स किसान > #माझंमत : परदेशी शेतकऱ्यांकडून प्रशिक्षण घ्या – सुरेश जोशी

#माझंमत : परदेशी शेतकऱ्यांकडून प्रशिक्षण घ्या – सुरेश जोशी

#माझंमत : परदेशी शेतकऱ्यांकडून प्रशिक्षण घ्या – सुरेश जोशी
X

भारत कृषी प्रधान देश अस पिढ्यान पिढ्या ऐकतोय पण माझ्या भाषेत कृषी "पर घाण" असं #माझंमत झालंय त्याची कारणे साधारणपणे अशी:

१) लहरी वरुणदेव

२) खताच्या अतोनात वापरामुळे जमीनीच्या पोतची हानी

३) विविध कारणांनी कमी झालेले कृषी क्षेत्र

वरिल तिनही बाबींच थोडक्यात विवेचन मी असे करीन की, जंगलतोड, वृक्षतोडीनं वरुणदेव नाराज झाल्यानं शेतकरी कमी पैशात, कमी पर्जन्यात चांगल पिकावं म्हणून खताकडे आकर्षिला गेला. अन त्यात गावाच शहरीकरणाच्या नादान कृषिक क्षेत्र अकृषिक झालं व त्यात भरीसभर लोकसंख्या दिवसेंदिवस वाढून जमीनीचे तुकडे तुकडे होत गेले. ऊत्पादन खर्चाचा मेळ शेतकऱ्यास कधीच बसवता आला नाही. सुधारीत जीवनशैली, लग्नकार्यात करण्यात येणाऱ्या अनाठाई खर्चापायी कर्जबाजारी होऊन अनेकांनी जीवनयात्रा संपवली, संपवत आहेत.

यातून सहजासहजी बाहेर पडणं मुश्किल असलं तरी अशक्य नाही पण तरीही सरकारनं व बँकानी कर्ज वसुलीचा तगादा न लावता, जगातील छोटेछोटे देशातील (तिथंही वरू देव हेच आहेत भलेही त्यांच नाव वेगळे असेल) शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रात बोलवाव. पाच वर्षापर्यंत त्यांच्या निगराणीखाली आपल्या शेतकरी बांधवांनी जमीन कसावी, मग बघा बळीराजा सुधारतो का नाही!

  • सुरेश जोशी, औरंगाबाद

Updated : 22 April 2017 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top