Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रातील कापूस गुजरातमध्ये 'कोण' पळवतंय?

महाराष्ट्रातील कापूस गुजरातमध्ये 'कोण' पळवतंय?

महाराष्ट्रातील कापूस गुजरातमध्ये कोण पळवतंय?
X

गुजरात सरकारने कापसाला ५०० रूपयांचे अनुदान जाहिर केल्याने गुजरातमधील व्यापारी महाराष्ट्रात कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा टॅक्स बुडत आहे,व्यापा-यांनी गुजरातला कापूस पळवल्याने महाराष्ट्रातील जीनला कापूस मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जीन बंद पडत आहेत. तसचं इथला कापूस गुजरातला गेल्यामुळे सरकी ऑइल मीलला सरकी कमी पडत असल्याने त्याचा फटका ऑइल मिलला बसत आहे. या सर्व बाबींचा परिणाम या उद्योगावर काम करणा-या रोजगारांवर होत आहे.

दरम्यान या सर्व प्रकाराकडे राज्य सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसंच शेजारील गुजरात राज्यात भाजपचेच सरकार असताना कापसाला ५०० रू. प्रति क्विंटल अनुदान दिले जात आहे, मात्र महाराष्ट्रात देखील भाजपचे सरकार सत्तेवर असताना शेतक-यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? पाहा हा व्हिडीओ

Updated : 24 Oct 2017 3:08 PM GMT
Next Story
Share it
Top