Home > मॅक्स किसान > महागाई भडकली

महागाई भडकली

महागाई भडकली
X

देशभरात सध्या अन्नधान्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून किरककोळ बाजारातील महागाईने गेल्या १५ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या किरकोळ महागाई ४.८८ इतकी वाढली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती ३.६३ टक्के इतकी होती. किरकोळ महागाईने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ५.०५ टक्क्यांचा उच्चांक नोंदवला होता. रिझर्व बॅंकेने ही महागाई ४ टक्क्यांच्या आसपास कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते मात्र ते मोठ्या फरकाने मागे पडले आहे.

या महागाईला अन्धान्यांच्या किंमतीमध्ये अचानक झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. गेल्या ऑक्टाबर महिन्यात ही वाढ १.९० टक्के होती. मात्र नोव्हेंबर मध्ये ती ४.४२ टक्के इतकी वाढली. अंड्यांच्या दरातही ७.९५ टक्के इतकी मोठी वाढ झाली. भाजीपाल्यांच्या किंमतीतही २२.४८ टक्के वाढ झाली आहे.

महागाईमध्ये वाढ होण्याचा अंदाज अर्थतज्ञांनी यापुर्वीच व्यक्त केला होता. मात्र ती अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा नव्हती, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. ओखी वादळाच्या प्रभावामुळे नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळे आणि भाजीपाल्याचे खूप नुकसान झाले. त्यामुळे फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन घटून दर वाढले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात केलेली वाढ आणि क्रूड तेलाच्या वाढलेल्या किंमतीचाही परिणाम महागाई वाढण्यात झाला आहे. दूसरीकडे जीएसटीमुळे कच्च्या मालाच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचा फटका महागाईच्या रुपाने बसत असल्याची प्रतिक्रीया जाणकारांनी दिली आहे.

Updated : 13 Dec 2017 7:09 AM GMT
Next Story
Share it
Top