Home > मॅक्स किसान > बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने 'पांढरे सोने काळवंडले'

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने 'पांढरे सोने काळवंडले'

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने पांढरे सोने काळवंडले
X

बीड: अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने वेग घेतल्यानं पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाताला आलेला कापूस पावसाने पूर्ण गळत असून कापूस पुर्णपणे काळवंडला असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कुठे कुठे तर या गाळलेल्या कापसामधील सरकीतून कोंब देखील आले आहेत. सोयाबीन,उडीद,बाजरी,फळबाग याचे देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झाले आहे.

गेली चार वर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या या मराठवाड्यावर गतवर्षीच्या परतीच्या पावसापासून वरुनराजाने कृपादृष्टी दाखवली आहे. चार वर्षे दुष्काळाने या शेतकऱ्यांची उभी पिकं करपली गेली तर या वर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तोंडाला आलेल्या पिकांसह हाताला आलेला कापूस देखील काळ्या मातीत लोळत आहे. यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

‍ या हंगामात सुरुवातीस पावसाचा पडलेला खंड, त्यानंतर आलेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र अगोदरचं बाधीत झाले असताना, परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. एकंदरीत अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला असताना सरकारी यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

Updated : 13 Oct 2017 8:02 AM GMT
Next Story
Share it
Top