Home > मॅक्स किसान > 'पांढ-या हत्तीचं गौडबंगाल' - कृषी विद्यापीठाला सात वर्षात एकही पेटंट नाही

'पांढ-या हत्तीचं गौडबंगाल' - कृषी विद्यापीठाला सात वर्षात एकही पेटंट नाही

पांढ-या हत्तीचं गौडबंगाल - कृषी विद्यापीठाला सात वर्षात एकही पेटंट नाही
X

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं नागपूर येथे महाविद्यालय आहे, या महाविद्यालयानं गेल्या सात वर्षांत एकाही पेटंटची नोंद केली नाही, शेतक्-यांच्या विविध समस्या तसचं नविन बी बियाणे यांचे संशोधन विद्यापीठात होणार नसेल तर शेतकऱ्यांचा विकास नेमका कसा होणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.दरम्यान माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब मॅक्स महाराष्ट्रच्या हाती आलीय.

नागपूरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती पीडीकेव्हीच्या नागपूर महाविद्यालयाला विचारली होती. शिवाय गेल्या सात वर्षांत या महाविद्यालयानं संशोधनावर नेमका किती पैसा खर्च केला, हा प्रश्न सुद्धा विद्यापीठाला माहिती अधिकारा अंतर्गत विचारण्यात आला होता. मात्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचे टाळले आहे. दरम्यान ही माहिती विद्यापीठाने दिली असती तर संशोधनावर होणारा खर्च आणि त्यात झालेलं संशोधन याचे पितळ उघडे झाले असते, त्यामुळे ही माहिती विद्यापीठाने दडवल्याचा मत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं.

सात वर्षांत एकंही पेटंट नाही, मग या कृषी विद्यापीठाच्या भरवशावर विदर्भाच्या शेतीचा डोलारा कसा पेलणार? हा प्रश्नही देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भात किटकनाशकं फवारताना विषबाधा होऊन तब्बल ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी हे हत्याकांड असल्याचं म्हटलंय, मग या शेतकरी हत्याकांडांच्या गुन्हेगारांमध्ये कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे का? अशी चर्चाही आता सुरु झालेली आहे.

https://youtu.be/8l7jDUj_MSE

Updated : 10 Oct 2017 11:21 AM GMT
Next Story
Share it
Top