Home > मॅक्स किसान > पंतप्रधान महोदय,किमान कांदा तरी सोडा

पंतप्रधान महोदय,किमान कांदा तरी सोडा

पंतप्रधान महोदय,किमान कांदा तरी सोडा
X

हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पनाला लागलीय, त्यामुळेच या निवडणुकींच्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यातंही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. गेल्या काही दिवसांत देशात कांद्याच्या दराने पंन्नाशी गाठलीय, येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे, पण निवडणुकांच्या पुढे कांद्याच्या दरवाढीमुळे भाजप नेत्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येऊ शकतं, म्हणूनच कांद्याची दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकार कांदाबाजारात हस्तक्षेप करत आहेत.

देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. या जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर बंधण आणायला आता सरकारने सुरुवात केलीय. व्यापाऱ्यांच्या मतानुसार प्रत्येकाला रोज कांद्याचा साठा आणि विक्रीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो. यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात असून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.

आपल्या देशात कांद्याच्या दरवाढीमुळे सरकार पडल्याचा इतिहास आहे, त्यामुळे गुजरात आणि हिमाचलप्रदेशच्या निवडणुकांपुढे भाजप कांद्याच्या दरावरुन कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कांदा पॉलीटीक्सचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसतोय.

Updated : 26 Oct 2017 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top