Home > मॅक्स किसान > नाफेड केंद्राला शेतकऱ्यांचा का आहे, अत्यल्प प्रतिसाद ?

नाफेड केंद्राला शेतकऱ्यांचा का आहे, अत्यल्प प्रतिसाद ?

नाफेड केंद्राला शेतकऱ्यांचा का आहे, अत्यल्प प्रतिसाद ?
X

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे खरीप हंगामासाठी शासन धान्य आधारभूत भावाने खरेदी करण्यास १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. माल खरेदीसाठी आजपर्यंत १९६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १५०३ शेतकऱ्यांच्या नोंदणी ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत. ज्यामध्ये सोयाबीनसाठी १४५ तर उडीद आणि मूग असे मिळून २९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासकीय हमी भावानुसार मूग - ५५७५ रुपये, उडीद - ५४०० रुपये, तर सोयाबीन - ३०५० रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करण्यात येत आहे, तर या केंद्रावर उडीद २०५० क्विंटल, सोयाबीन २०८४ क्विंटल, तर मूग ४३९ क्विंटल खरेदी करण्यात आला आहे. म्हणजे २३ दिवसात अत्यल्प प्रतिसाद हा शेतकऱ्यांकडून या शासकीय खरेदी केंद्रावर पाहायला मिळत आहे.

गेल्या हंगामातील शासकीय तूर खरेदीमधील गैरप्रकार, त्याचबरोबर दोन ते तीन महिने माल खरेदी न होणे, खरेदी झाल्यास चेक लवकर न मिळणे, चेक मिळाल्यास खात्यात पैसे यायला विलंब होणे अशा एक न अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या समोर आल्यानं शासन खरेदी केंद्रावर भाव जास्त असून देखील पैसे लवकर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल हा खाजगी व्यापाऱ्यांकडे जास्त पाहायला मिळत असून नाफेड केंद्राला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे हमी भावासोबत तात्काळ नोंदणी ताबडतोब मोजणी आणि काही रक्कम रोख तर उर्वरित रक्कम चेक द्वारे मोजक्या दिवसात खात्यात जमा झाल्यास शेतकऱ्यांचे व्यवहार सोयीस्कर होऊन शेतकऱ्यांचा कल शासकीय केंद्रांकडे नक्कीच वाढू शकतो.

Updated : 10 Nov 2017 1:59 PM GMT
Next Story
Share it
Top