Home > मॅक्स किसान > नाना पटोलेंचे फडणविसांना 'टोले’

नाना पटोलेंचे फडणविसांना 'टोले’

नाना पटोलेंचे फडणविसांना टोले’
X

विदर्भात विषारी किटकनाशक बळींचा आकडा 40 वर गेला असून हा अपघात नसून हत्याकांड आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्यानंतर हाच धागा पकडून भाजप खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे.

यवतमाळ शेतकरी मृत्यू प्रकरणी फडणवीस सरकार उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. शेतक-यांचा विषारी किटकनाशकांचा मृत्यू झालेला असताना, चीनची औषध भारतात विकली जात असताना सरकार या विषारी किटकनाशकांवर बंदी का आणत नाही ? असा सवाल करत नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्याना लक्ष्य केलं आहे.

तसचं 40 शेतक-यांचा विषारी किटकनाशकांमुळे बळी गेला असताना मुख्यमंत्र्यांना वर्धा येथे कार्यक्रमाला यायला वेळ आहे, मात्र यवतमाळ येथील शेतक-यांना भेटायला वेळ नाही असा टोला देखील नान पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

https://youtu.be/Q8iMd0S0yOw

Updated : 10 Oct 2017 9:22 AM GMT
Next Story
Share it
Top